शेतकरी हिताचीच भूमिका राज ठाकरे घेतील : बाळा नांदगावकर

मुंबई : राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे मनसेही या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर मनसे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांची प्रतिक्रिया दिली .

ग्रा.पं. निवडणूक ताकदीने लढवतोय. आगामी निवडणुकाही लढवणार राजकारणात काहीही होऊ शकते . वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष एकत्र आले आहे . ‘आमची हिंदुत्वाची, मराठीची भूमिका कायम’ ‘शेतकरी हिताचीच भूमिका राज ठाकरे घेतील, असेही नांदगावकर म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER