
मुंबई : मराठीच्या मुद्दयावरून मनसेने ‘अॅमेझॉन’बाबत, अॅमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नसेल, तर आम्हाला महाराष्ट्रात ॲमेझॉन मान्य नाही, अशी रोकठोक भूमिका घेतली. मनसेविरुद्ध अॅमेझॉन न्यायालयात गेली. राज ठाकरे (Raj Thackeray) याना न्यायालयाने नोटीस बजावली. ५ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. यावर मनसेचे (MNS) नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी इशारा दिला, अॅमेझॉनला (Amazon) याची किंमत मोजावी लागेल.
अॅमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नसेल, तर आम्हाला महाराष्ट्रात ॲमेझॉन मान्य नाही, ही मनसेची भूमिका स्पष्ट आहे. ॲमेझॉन ॲप आतापर्यंत हजारो लोकांनी अनइन्स्टॉल केला आहे, अद्यापही ती प्रक्रिया सुरु आहे. अॅमेझॉन लवकर वठणीवर आली नाही, तर महाराष्ट्रात त्यांचा व्यवसाय ठप्प होणार हे शंभर टक्के लक्षात ठेवा, असे मनसेने बजावले.
वाद
अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमेत अॅमेझॉनविरोधात (Amazon) ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’चे फलक लावण्यात आले आहेत. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक लागले आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले होते. यापूर्वी मनसेने अॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर फलक लावण्याचा इशारा दिला होता. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला