भाजपासोबत युतीचा निर्णय राज ठाकरेच घेतील – राजू पाटील

Raj Thackeray - BJP - Raju Patil

नवी मुंबई : मनसे (MNS) नवी मुंबई मनपा निवडणुक लढणार की कुणासोबत जाणार या बद्दलचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) लवकरच घेतील अशी माहिती आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी नवी मुंबईत एका उद्घाटन कार्यक्रमात दिली. भाजपासोबत (BJP) युती होणार का, याच्या उत्तरातही त्यांनी, या बद्दलचा निर्णय राज ठाकरे घेतील, असे सांगितले.

दरम्यान, नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (Shiv Sena), भाजपा आणि राष्ट्रवादीने (NCP) जोरदार तयारी सुरू केली असताना या निवडणुकीत चमत्कार घडवून आणण्यासाठी मनसेनेही कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजाव अमित ठाकरे यांच्या हस्ते आज नवी मुंबईतील तीन शाखांचे उद्घाटन होणार आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठीच राज ठाकरे यांनी अमित यांना पालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले, अशी चर्चा आहे.

अमित ठाकरे (Amit Thackeray), शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) आणि आमदार राजू पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहेत. ३० – ३५ गाड्यांच्या ताफ्यासह अमित ठाकरे वाशी टोल नाक्यावर आले. तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा ताफा बेलापूरकडे रवाना झाला. दुपारी 3 वाजता अमित ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईतील तीन शाखांचे उद्घाटन झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER