बेपर्वा केली असेल तर कडक शिक्षा व्हायला हवी; नाशिक दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले

Nashik - Raj Thackeray

मुंबई : नाशिकमधील महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) ऑक्सिजनची गळती झाली. आणि त्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने २२ रुग्णांना जीव गमवावा लागला. यात ११ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दुःख व्यक्त करत अशा प्रकारच्या घटना पुढे घडू नये, असे म्हणत भावना व्यक्त केल्या आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आहे; पण जर कुणाकडून बेपर्वा झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button