कॉंग्रेसचा चाणक्य हरपल्याने राज ठाकरेही हळहळले

Raj Thackeray - Amit Thackeray - Ahmed Patel

मुंबई :- कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अहमद पटेल यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. अहमद पटेल हे  राजपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या लग्नाला उपस्थित झाले होते. तो क्षण ठाकरे कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण होता.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते. राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते. पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली. तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे यासाठी वापरले  नाही, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

अहमद पटेल यांचा मृत्यू काँग्रेस पक्षासाठी मोठा हादरा ठरू शकतो. सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांनी प्रयत्न करूनही देशात काँग्रेस पक्ष उभारणीची चिन्ह दिसत नसताना, पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षविरोधी सूर आळवत असताना, काँग्रेसची विभागणी होण्याच्या मार्गावर असताना, संपूर्ण पक्षाला एकसंध बांधून ठेवण्याचं काम अहमद पटेल यांनी केले होते; मात्र त्यांच्या निधनामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

काँग्रेसच्या काळजीवाहू अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी ट्विट करून अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली. यात त्यांनी ‘ मी एक अत्यंत विश्वासू सहकारी, जवळचा मित्र गमावला आहे. असा कॉम्रेड होणे नाही.’ असे म्हटले आहे. येणाऱ्या कठीण काळात सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी दोघांनाही अहमद पटेल यांची कमी खूप जाणवेल हे निश्चित.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER