… आणि पुन्हा १५ महिन्यांनंतर राज – उद्धव ठाकरे दिसणार एका मंचावर

मुंबई :- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. येत्या २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयासमोर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः राज ठाकरे यांना भेटून दिले आहे.

“शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार सर्वांना निमंत्रण देत आहे. सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं जात आहे.नोव्हेंबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा सोहळा शिवाजी पार्कात घेण्यात आला. या सोहळ्याला देशभरातले प्रमुख नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण होतं. राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर राज-उद्धव एका मंचावर आलेले नाहीत.

आता जर बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरप्रसंगी राज ठाकरे उपस्थित राहिले तर उद्धव-राज जवळपास १५ महिन्यांनी एका मंचावर येतील. दोन भाऊ विभक्त झाल्यापासून दोन्ही ठाकरे जेव्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा तेव्हा या भेटीची राज्यात विशेष चर्चा होते. राज ठाकरे (Raj Thackeray) नुसते विभक्तच झाले नसून त्यांनी आपली वेगळी राजकीय ओळख वेगळा पक्ष काढून निर्माण केली आहे. त्यामुळे राजकीय पातळीवर या दोन्ही ठाकरेंची भेट लोकांच्या आवडीचा व चर्चेचा भाग बनते हे विशेष.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेबांच्या जयंती कार्यक्रम निमंत्रणाची जबाबदारी महापौर किशोरी पेडणेकरांकडे ; फडणवीस, राज ठाकरे नंतर पवारांची घेणार भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER