
मुंबई : नाणार प्रकल्पाला मनसेने सदसदविवकेबुद्धीने पाठिंबा दिला आहे, अर्थबुद्धीने नव्हे. वेळ पडल्यास नाणारसाठी राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटतील, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा देत हा प्रकल्प पूर्ण करा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
याबाबत बाळा नांदगावकर म्हणालेत की, राज ठाकरे यांनी कोकणात जाऊन तिथल्या आंदोलकांना पाठिंबा दिला होता. आता त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधायचा आहे. पर्यावरणाचा प्रदूषणाचा आणि निसर्गाचा समतोल साधून लोकांना रोजगार कसा मिळेल? उद्योग कसा मिळेल? या सगळ्याची सांगड घालून या प्रकल्पाला पाठिंबा देत आहोत.
नाणारप्रकरणी राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याबाबत अजून काही ठरलेले नाही. त्यांनी पत्रं लिहिले आहे. वेळ पडल्यास ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात. राज यांचा कोकण दौरा अजून ठरलेला नाही, असे ते म्हणालेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला