राजकीय दिग्गजांच्या गर्दीपासून लांब राहण्यासाठी राज ठाकरेंनी अमितला दाखवले कॉर्नर

Raj Thackeray - Amit Thackeray

मुंबई : शनिवारी शिवसेनाप्रमुख (Shiv Sena), हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून त्यांच्या मुंबईतल्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलं. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापासून ते राज ठाकरे (Raj Thackeray), प्रवीण दरेकरांपर्यंत अनेक नेते उपस्थित होते. नेत्यांच्या या गर्दीत मनसेचे (MNS) नेते अमित ठाकरेही (Amit Thackeray) उपस्थित होते. पण जेव्हा नेत्यांची फोटो काढण्याची वेळ आली तेव्हा राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना इशारा केला आणि दिग्गजांच्या गर्दीतून लांब राहण्याची सूचना केली.

शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कुलाबा येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे आणि अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. शरद पवार कार्यक्रमस्थळी आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह सर्वच नेत्यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर सर्वच नेते फोटो काढण्यासाठी पुतळ्याजवळ उभे राहिले. तेवढ्यात राज यांनी अमित ठाकरे यांना बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बोलावलं. समोर असलेली फुलं घेण्याचं त्यांनी अमित यांना बोटानंच खुणावलं. त्यानंतर अमित ठाकरे यांनी पुष्प अर्पण करून बाळासाहेबांना अभिवादन केलं. बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर अमित नेत्यांच्या गर्दीत उभे राहिले. राज यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच अमित यांना तिथून बाजूला जाण्याचा इशारा केला. अमित ठाकरेही लगेचच तिथून बाजूला झाले आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या बाजूला जाऊन उभे राहिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER