राज ठाकरे-शरद पवारांची चर्चा; युतीला पाडण्यासाठी षडयंत्र रचणार!

Raj Thackeray-Sharad Pawar's discussion

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याची स्पष्ट कबूली मनसे अध्य7 राज ठाकरे यांनी दिली असून देशाचा कारभार राष्ट्रीय पक्षांनी चालवावा आणि राज्याची सत्ता प्रादेशिक पक्षांकडेच असावी, अशी आपली भूमिका असून या भूमिकेवर आपण ठाम असून यामुळे यापुढे आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे राज ठाकरे यांनी सोमवारी येथे जाहीर केले. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य यांच्यामध्ये नेमके अधिकार कसे असले पाहिजेत, हा विषय घेऊन लढा देणार असल्याचे राज म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’चं काय झालं; पवारांची मोदींना विचारणा!

मनसेला केवळ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढवण्यात रस आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या रिंगणात ते उतरणार नसले, तरी भाजप-शिवसेना युतीला पाडण्यासाठी मनसे शरद पवारांना मदत करणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले आहे अशी माहिती एका वृत्तसंस्थेकडून समजते.

दरम्यान, येत्या शनिवारी, म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी पाच वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात राज ठाकरे सभा घेणार आहेत. महाराष्ट्र सैनिकांनो ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार राहा’ असे लिहिलेले पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सभेत राज कोणता मोठा निर्णय घेणार आणि तो काय असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.