…आणि राज ठाकरेंना उर्दू वर्तमान पत्रात मिळाले महत्वाचे स्थान!

raj-thackeray-sabha-advertisement-in-urdu-newspaper

नांदेड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज (12 एप्रिल) नांदेडच्या दौऱ्यावर असून ते सभा घेणार आहेत. या सभेसाठी राज ठाकरे नुकतेच नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. सध्या संपूर्ण नांदेडमध्ये फक्त राज ठाकरे यांच्या सभेचीच चर्चा रंगली असून, त्यांच्या सभेला गर्दी जमावी यासाठी चक्क उर्दू वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात आल्या आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंची आज नादेंडमध्ये सभा ; अशोक चव्हाणचा करणार प्रचार 

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दहा सभेचे आयोजन केले आहे. यातील पहिली सभा आज संध्याकाळी 5.30 वाजता नांदेडमध्ये पार पडणार आहेत. नांदेड हा काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे. नांदेडच्या या सभेसाठी काल मुंबई देवगिरी एक्स्प्रेसने राज ठाकरे मनसैनिकांसह रवाना झाले. नांदेडमध्ये दाखल होताच त्यांनी सर्वप्रथम नांदेडच्या प्रसिद्ध गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले.

दरम्यान राज ठाकरे यांच्या सभेची चर्चा नांदेडमधल्या सर्व उर्दू वर्तमानपत्रात जाहिराती स्वरुपात पाहायला मिळत आहे. नांदेडमधील प्रसिद्ध उर्दू वर्तमानपत्रात पहिल्या पानावर राज यांची जाहिरात देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे चक्क मराठी भाषेत या जाहिराती देण्यात आल्या आहेत. ‘जे बोलतो ते पुराव्यासहित बोलतो’ असे या जाहिरातीत म्हटले आहे. मराठी माणसांच्या स्वाभिमानासाठी लढणारे राज पहिल्यांदाच उर्दू जाहिरातीत झळकले आहेत. राज ठाकरेंच्या सभेला गर्दी जमावी या उद्देशाने हा पॅटर्न वापरण्यात आल्याची सर्वत्र चर्चा आहे. पण या पॅटर्नचा उपयोग राज ठाकरे आणि आघाडीला होतो का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.