‘गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हीच राज ठाकरेंची भूमिका’, संभाजीराजेंची माहिती

मुंबई :- मराठा आरक्षणासाठी भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी आजपासून सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली. जवळपास १ तास या दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीनंतर संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधत राज आणि माझा कॉमन पाईंट असल्याचे सांगितले.

यावेळी संभाजी राजे (Sambhaji Raje) म्हणाले, मराठा समाजाला योग्य तो न्याय मिळावा म्हणून सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहे. मराठा हा प्रमुख समाज आहे. त्या समाजाचे आरक्षण रद्द झाले. आता त्यावर तोडगा काढायचा आहे. हा मात्रा आता हा विषय एकट्याचा नाही तर समाजाला न्याय मिळवून देण्याचा आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जातीपातीच्या राजकारणाला थारा देत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हीच त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे हे जीवलग मित्र होते. दोन्ही घराण्याचं मैत्रीचं नातं आजही काम आहे. राज आणि माझा कॉमन पाईंट आहे. किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन करण्याबाबतही चर्चा झाली, अशी माहितीही संभाजीराजे यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही; निलेश राणेंचा घणाघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button