राज ठाकरेंकडून मनसैनिकांचे कौतुक

Shobha Deshpande - Raj Thackeray

मुंबई : सराफा दुकानदारास मराठी बोलता येत नसल्याने लेखिका शोभा देशपांडे (Shobha Deshpande) यांनी मराठीच्या आग्रहासाठी केलेले ठिय्या आंदोलन चर्चेचा विषय ठरले. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी सर्वात आधी पोहोचलेल्या मनसैनिकांचे राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे.

मुंबईतील (Mumbai) कोलाबा परिसरात महावीर ज्वेलर्स मालकाला लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागायला भाग पाडल्याबद्दल सोबतच मराठीचा द्वेष करणाऱ्या परप्रांतीयाला चोप दिल्याबद्दल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या कार्यकर्त्यांची पाठ थोपटली आहे.

कोलाबा येथील महावीर ज्वेलर्सकडे देशपांडे गुरुवारी गेल्या होत्या. मात्र, ज्वेलर्सने मराठीत संभाषण साधण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त होत त्यांनी दुकानासमोर ठिय्या मांडला. तब्बल १८ तास हा लढा सुरू असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. झालेल्या गैरप्रकाराबद्दल सराफाला मराठीतून माफी मागण्यास सांगितले. सराफाने माफी मागितल्यानंतर शोभाताईनी आपले आंदोलन मागे घेतले. सोशल मीडियात याची दिवसभर चर्चा होती. दुकानदाराने मराठीतून माफी मागितल्यानंतर देशपांडे दुकानाचा परवाना दाखविण्यावर ठाम होत्या. अखेर, पोलिसांसह मनसे कार्यकर्त्यांनी देशपांडेंची समजूत काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER