राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात भेटण्याचा प्लॅन; चाचणी अभावी प्रवेश नसल्याने माघारी?

मुंबई:‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना भेटण्यासाठी विधान भवनात (Maharashtra Vidhan Bhawan) येणार होते. पण राज ठाकरे विधान भवनात आल्यावर त्यांना कोविड 19 (Covid19) संसर्ग RTPCR चाचणी करणं आवश्यक होते . पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही कोरोना चाचणी केली नसल्यामुळे त्यांना विधान भवनात येता आले नाही.

राज ठाकरे हे वीजबिल आणि अन्य प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार होते अशी माहिती आहे. त्यासाठी ते मंत्रालयाच्या दिशेने निघणार होते. मात्र मंत्रालयात विनामास्क आणि विना RTPCR चाचणी प्रवेश नाही याची त्यांना माहिती मिळाली. राज ठाकरे हे मास्क वापरत नाहीत असे त्यांनी यापूर्वीच सांगितले होते . त्यामुळे आपल्याला प्रवेश मिळणार नाही याची कुणकुण लागल्याने राज ठाकरे माघारी फिरल्याचे सांगण्यात येत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER