राज ठाकरेंचा संपूर्ण लॉकडाऊनला विरोध

Raj Thackeray

मुंबई : सध्याचा कोरोनाचा (Corona) वाढता संसर्ग आणि लॉकडाऊन (Lockdown) या विषयावर सर्वपक्षीय नेत्यांचे मत जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) बैठक घेत आहेत. मात्र या बैठकीत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सहभागी होऊ शकले नाहीत. राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या कंबरेचे स्नायू दुखत असून त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आठ दिवसांच्या लॉकडाऊनसाठी आग्रही असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. मात्र आता पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेची माहिती दिली. राज ठाकरे यांनी संपूर्ण लॉकडाऊनचा विरोध केला आहे. काही कडक निर्बंध लावण्यात यावे अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button