… तेव्हा मोदी लाटेत मलाही चापट्या बसल्या : राज ठाकरेंची कबुली

Maharashtra Today

मुंबई :- २०१४ मध्ये मोदी लाटेत भल्याभल्या पक्षांना चापटय़ा बसल्या. देशाची ६५ वर्षे सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली हे सध्या आपण बघतो. एका पक्षाची लाट येते तेव्हा अन्य पक्षांवर त्याचा साहजिकच परिणाम होतो. यामुळे मोदी लाटेत (Modi Wave) मलाही चापट्या बसल्या याची कबुली मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिली. लोकसत्ताच्या मुलाखतीत ते बोलत होते.

निवडणुकीच्या निकालांवरून राजकीय पक्षांचे मूल्यमापन करणे चुकीचे आहे. अटलबिहारी वाजपेयी (Atal bihari vajpayi) यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांचा मतांमध्ये पराभव झाला, पण वाजपेयी यांचे नेतृत्व कायम राहिले. त्यांच्या नेतृत्वावर परिणाम झाला नाही. पुढे वाजपेयी पंतप्रधान झाले. १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा दारुण पराभव झाला होता. पण पुढे त्या पुन्हा सत्तेत परतल्या. शिवसेनेच्या बाबतीतही तसे झाले. राजकीय पक्षांना चढ-उतार सहन करावेच लागतात. भरती-ओहोटी सुरूच असते. भरती आली म्हणून मला भरून येत नाही वा ओहोटी लागली म्हणून वाईटही वाटत नाही, असे राज ठाकरे यांनी मिश्कीलपणे सांगितले. २००९, २०१०, २०११, २०१२ पर्यंत मनसेचा आलेख वरवर जाणारा होता, असेही राज ठाकरे म्हणाले .

कोरोनामुळे सारेच वातावरण अस्थिर आहे. लोकांमध्ये साहजिकच भीतीचे वातावरण आहे. समाज अस्थिर असताना निवडणुका घेणे कितपत योग्य याचाही विचार झाला पाहिजे. निवडणुकांचा विचारही लोकांच्या मनात नसेल. पण जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा मनसे पूर्ण ताकदीने या निवडणुका लढवेल. मुंबईबरोबरच राज्यातील अन्य पालिकांमध्येही मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

मनसे कोणाबरोबर युती करणार का, या प्रश्नावर ‘कोणी डोळे मारले वा कोणी पत्रे पाठविली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. निवडणुका होतील तेव्हा कोणाबरोबर हातमिळवणी करायची का हे तेव्हा बघू’, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मनसेला गळती लागली. अनेक जण पक्ष सोडून गेले याकडे ठाकरे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी, सोडून गेले ते एकटे गेले. एखादा नेता अथवा पदाधिकारी पक्ष सोडून गेल्यावर त्याची एक दिवस बातमी होते. नेते सोडून गेले तरी कार्यकर्ते पक्षातच आहेत. कोणीही पक्ष सोडून गेल्यावर वाईट वाटते. पक्षांतर हे के वळ मनसेत होते असे नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपमध्ये गेले. यामुळे हे पक्ष संपले का, असा सवाल ठाकरे यांनी के ला. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातही माजी महापौर हेमचंद्र गुप्ते यांच्यासह अनेक जण सोडून गेले. पक्ष सोडून जाणे किंवा अन्य पक्षातील नेते नव्याने सहभागी होणे ही प्रक्रि या सुरूच असते. अगदी करोना महासाथीच्या काळात मनसेमध्ये मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले, असेही त्यांनी सांगितले.

मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि माझ्या सहकार्यांचं काम आहे. पक्ष म्हणून नेता ओळखला जातो. एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून बघितलं जातं. भारतात निवडणुका प्रतिकांवर होत असतात. लोकांनी मोदींना पाहून मतदान केले . तर बाळासाहेबांना पाहून सत्ता दिली, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. देशात जो लाट निर्माण करतो तो जिंकतो. तसंच झालं. सध्या कोरोनाच्या लाटेवर सगळे स्वार आहेत, असा चिमटा मनसे नेते राज ठाकरे यांनी काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button