राज ठाकरे यांचा न्यू लूक, ‘टीशर्ट-गॉगल आणि दाढी’

Raj Thackeray

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले. याकाळात अनेकांनी हटके लूक आजमावून बघितले. अगदी सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत बऱ्याच जणांनी घरच्या घरी हटके लूक केला. नेते मंडळीही याला अपवाद ठरलेले नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचाही एक ‘कूल लूक’ समोर आला आहे.

लॉकडाऊनमध्ये (Lockdown) सलून बंद असताना कोणी वाढलेल्या केसांची अनोखी स्टाईल केली, तर कोणी घरच्या घरी केसांना कात्री लावली होती. कोणी दाढीला नवा आकार दिला. गॉगल आणि टीशर्ट घातला असतानाचा राज ठाकरे यांचा फोटो समोर आला आहे. राज ठाकरे यांच्या नव्या फोटोत त्यांची वाढलेली दाढी दिसत आहे.

दरम्यान, जानेवारी महिन्यात मुंबईत मनसेचे महाअधिवेशन संपन्न झाले होते. त्यावेळीही राज ठाकरे यांच्या लूककडे सर्वांचे लक्ष गेले होते. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात फेब्रुवारी महिन्यात मनसेने मोर्चाचे आयोजन केलं होतं. राज ठाकरे यांनी या मोर्चासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. तर कपाळाला भगव्या रंगाचा टिळा लावला होता. मनसेचा नवा झेंडा असलेला बॅच उजव्या हाताला बांधला होता. राज ठाकरेंनी पांढऱ्या आणि करड्या रंगाचे शूज घातले होते. मात्र या शूजच्या लेसचा रंगही भगवा होता.

Photo Source :-TV9 Marathi

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER