मनसेचे इंजिन पुन्हा रुळावर येणार ; ग्रामपंचायत निवडणुकांसाठी बैठकीचे सत्र सुरु

Raj Thackeray

मुंबई :- लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपची चिंता वाढविणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे .

राज ठाकरेंचा पक्ष हा फक्त मुंबई, नाशिक, ठाणे पुण्यासारख्या मोठ्या शहरात अस्तित्वात आहे, अशी टीका नेहमी केली जाते. पण, यावेळी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने मनसे (MNS) पहिल्यांदाच गावपातळीच्या राजकारणात आपली ताकद वाढविणार आहे .

ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज ठाकरेंच्या ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या घोषणेमुळे मनसे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष वेगाने तयारीला लागले आहेत.

मनसे कार्यकर्त्यांच्या बैठका जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात सुरु झाल्यात. सध्या रिव्हर्स मोडवर असलेले मनसेचे इंजिन ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा रुळावर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. म्हणून मनसेने आपला मोर्चा गाव पातळीवर वळवला .

दरम्यान पुणे जिल्ह्यातील 1400 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मनसेच्या पॅनेलतर्फे उमेदवार मैदानात असतील. त्यातच राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तालुकास्तरावर बैठका, मेळावे घेण्याचे आदेश दिले आहेत. तर राज ठाकरे 23 तारखेनंतर स्वत: पुणे जिल्ह्यात मेळावा घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER