‘राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांना का भेटले हे राऊतांना आता समजले असेल’

raj thackeray and uddhav thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीत, याची माहिती असल्यामुळेच राज ठाकरे (Raj Thackeray) वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना भेटायला गेले होते, असा टोला ‘मनसे’कडून लगावण्यात आला आहे.

वाढीव वीज बिलांबाबत सामान्यांना दिलासा मिळेल, असे राज्य सरकार सुरुवातीला सांगत होते. मात्र, आता उर्जामंत्र्यांनी स्पष्ट करत लोकांना वीजेची बिले भरावीच लागतील, असे जाहीर केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठलंही निर्णय घेऊ शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे आता संजय राऊत यांना राज ठाकरे मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना का भेटायला गेले, हे आता समजले असावे, असा टोला मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी लगावला.

लॉकडाऊन काळात अनेकांची कार्यालये बंद होती. मग वीज न वापरताही त्यांनी बिल का भरावे? जनता रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत सरकारचं डोकं ठिकाणावर येणार नाही. त्यामुळे आता सरकारने जनक्षोभासाठी तयार राहावे, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER