मनसेचा हुकमी एक्का मैदानात; राज ठाकरे पदवीधर निवडणुकीच्या प्रचारात?

Raj Thackeray

पुणे : राज्यातील पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष प्रचारात उतरले आहेत. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) प्रचार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी रुपाली पाटील-ठोंबरे तर शिक्षक मतदारसंघासाठी विद्याधर मानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दोन्ही मतदारसंघातील घडामोडींवर स्वत: लक्ष ठेवून असल्याचे समजते.

राज्यातील तरुणांमध्ये राज ठाकरे यांची एक वेगळी प्रतिमा असून ते खूपच लोकप्रिय आहेत. त्यांच्या सभांसाठी तरुणवर्ग नेहमीच मोठ्याप्रमाणावर गर्दी करत बसतो. त्यामुळे पदवधीर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेला याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळेच राज ठाकरे यांच्याकडून शुक्रवारी पुण्यात मेळावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेल्या रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांचं विशेष काम आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्या उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण बी.कॉम LLB झाले आहे. त्या व्हॉलीबॉल आणि शुटिंग व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत. त्यामुळे आता रुपाली पाटील-ठोंबरे पदवीधर मतदारांना साद घालण्यात कितपत यशस्वी ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER