राज ठाकरेंनी छत्रपतींच्या पराक्रमाचा व्हिडीओ व्हायरल करून दिली मानवंदना

Raj Thackeray - Chhatrapati Shivaji Maharaj

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देणारा व्हिडीओ स्वतःच्या आवाजात बनवून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन सुभाषचंद्र बोस आपल्या सहकाऱ्यांना कसे पटवून देतात हे सांगितले. एके दिवशी सुभाषचंद्र बोस हे सिंहगडावर त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन आलेत. त्यात काही बंगाली कवी होते, लेखक होते. सुभाषबाबूंनी त्यांना सांगितलं की काही लिहायचे असेल तुम्हाला आयुष्यात तर ‘शिवाजी’ या तीन अक्षरांबाबत लिहा.

कविता करायच्या असतील तर या माणसावर करा. यांच्यावर तुम्ही जेवढं  लिहाल, जेवढं लोकांपर्यंत पोहचेल तेवढं तेवढं स्वातंत्र्य आपल्या जवळ यायला लागेल. ‘ह्या हिंदभूमीवरील स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा म्हणजे शिवछत्रपती… कालही, आजही आणि उद्याही!’ असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER