सिद्धीविनायक मंदीराकडून शिवभोजन योजनेसाठी 5 कोटी रुपये देण्यास मनसेचा आक्षेप

Raj Thackeray - ShivBhojan Thali

मुंबई : सुमारे 220 वर्षे जुन्या सिद्धिविनायक मंदीराकडून राज्य सरकारच्या शिवभोजन थाळीसाठी 5 कोटी रुपये अनुदान देण्याला राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. श्री सिद्धि विनायक गणपती मंदीर ट्रस्ट (एसएसजीटीटी) काही व्यक्तींना खूष करण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप मनसे चे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

आम्हाला माहित आहे ट्रस्टचे सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य आहे. भक्तांच्या असिम श्रद्धेमुळे भक्त मोठ्या प्रमाणात मंदीराला देणगी मिळते. मांत्र या पद्धतीने या पैशाचा उपयोग शासकीय योजनेसाठी व्हायला नको, असेही देशपांडे यांनी म्हटलेा आहे.

राज्यातील अहमदनगर येथील शिर्डीचा साईबाबा मंदीर किंवा शेगाव येथील गजानन महाराज मंदीर ट्रस्ट सारख्या प्रमुख देवस्थान ट्रस्टला मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात. त्याचा उपयोग दररोज मोठ्या प्रमाणात हजारों भक्तांच्या प्रसाद आणि जेवणावर खर्च केला जातो. जर सिद्धिविनायक ट्रस्ट खरोखर गरीबांची मदत करू इच्छित असले तर त्यांनी सरकारच्या या योजनेवर खर्च करण्याऐवजी गरीब भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करावी, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे.

आम्ही ट्रस्टचे अध्यक्ष आणि चित्रपट अभिनेते आदेश बांदेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की हा निर्णय ट्रस्टच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला असून आता याबाबत सरकारला निर्णय घ्यावयाचा आहे. मनसेच्या आक्षेपाचा मुद्दा टाळत आदेश बांदेकर एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की राज्य सरकार गरीबांच्या जेवणासाठी ही चांगली योजना राबवत आहे.