जागतिक पुरस्कार जिंकणाऱ्या मराठमोळ्या शिक्षकाचे राज ठाकरेंनी केले कौतुक

Raj Thackeray - Ranjit Singh Disale

मुंबई :- सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले (Ranjit Singh Disale) यांनी युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावला. सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. डिसले यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

युनेस्को (UNESCO) आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. रणजितसिंह तुमचं मनापासून अभिनंदन! तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय”, असे लिहित राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे डिसले यांचे कौतुक केले.

QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत रणजीतसिंह डिसले यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER