उत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली

Jaswant Singh - Raj Thackeray

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग (Jaswant Singh) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पोखरण 2 च्या अणुचाचण्यानंतर अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले, अशा वेळेस जसवंत सिंग यांनी उत्तम मुत्सद्दीपणाचं कौशल्य दाखवत ते निर्बंध उठवायला लावले. आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीतील देशातील काही मोजक्या प्रभावी मुत्सद्द्यांपैकी ते एक. जसवंत सिंग यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन” असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

जसवंत सिंग यांना आज (२७ सप्टेंबर) सकाळी ह्रदयविकाराच झटका आला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER