‘बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार राज ठाकरेच; भूमिपूजन कोण करते याला महत्त्व नाही’

Maharashtra Today

मुंबई :- आज सायंकाळी ५ वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या भूमिपूजनाचं आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांना वगळून इतर कोणत्याही दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे बंधू आणि बाळासाहेबांचे  बाळकडू लाभलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे मनसेचा संताप उडाला असून मनसेने शिवसेनेवर खोचक टीकाही केली आहे.

ही बातमी पण वाचा : आज बाळासाहेब स्मारकाचं भूमिपूजन, राज ठाकरेंसह विरोधी नेत्यांना निमंत्रण नाही

मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करून शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे. बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत, हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्त्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं  नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनीही विरोधकांना निमंत्रण न पाठवल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

विरोधकांना भूमिपूजन सोहळ्याला बोलवायला हवं होतं. बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. या वेळीही सरकारने तसं करायला हवं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रचंड प्रयत्न केले होते. लागणाऱ्या सर्व परवानग्या त्यांनी मिळवून दिल्या होत्या. त्यांना बोलवायला हवे होते. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button