राज ठाकरे डिप्लोमॅटिक, ते यू-टर्न घेणारे नाहीत; दरेकरांकडून राज ठाकरेंचे गुणगान

Pravin Darekar - Raj Thackeray

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिले असून त्यांच्या या निर्णयाचे त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी स्वागत केले आहे. राज ठाकरे हे डिप्लोमॅटिक नाहीत. ते यू-टर्न घेणारे नाहीत, अशा शब्दात राज यांची स्तुती करतानाच दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना टोला लगावला.

राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून राज यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. राज ठाकरे यांनी या प्रकल्पाला कधीकाळी विरोध केला होता. आता त्यांनी तज्ज्ञांची मते जाणून घेतली आहे. त्यामुळे या प्रकल्पावर आता त्यांचा विश्वास बसला आहे. कोकणाच्या प्रगतीसाठीच राज यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करत आहोत, असं दरेकर म्हणाले.

भाजप सतत विकासाच्या बाजूने उभा राहिला आहे. त्यात कधीही तडजोड केली नाही. या प्रकल्पामुळे कोकणची आर्थिक प्रगती होत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकल्पाला समर्थन द्यावे. शिवसेनेला कोकणाने खूप काही दिलं आहे. कोकण नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. राज ठाकरे यांच्यासोबत मी काम केलं आहे. ते डिप्लोमॅटिक बोलत नाहीत. ते कधीही यू-टर्न घेत नाहीत. ते एखाद्या गोष्टीला बेधडक समर्थन देतात किंवा विरोध करतात. त्यांच्याकडे यू-टर्न असा नसतो, असं सांगत दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER