टेनिस खेळताना राज ठाकरेंच्या हाताला दुखापत; तातडीने घेतले उपचार

Raj Thackeray

मुंबई :- मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे काल (सोमवारी) संध्याकाळी टेनिस खेळत होते. त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. त्यांनी तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यांच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताला सपोर्टर लावलं आहे. ही दुखापत काळजी करण्याइतकी मोठी नाही.राज ठाकरे यांच्या हाताला यापूर्वीही दुखापत झाली होती.

त्यांच्या उजव्या कोपराला टेनिस एल्बोचा त्रास होता. त्यावेळी त्यांनी हाताला सपोर्टर लावला होता. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांच्या हाताचा सपोर्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. स्वतःला फिट ठेवण्यासाठी राज ठाकरे यांनी नियमितपणे लॉन टेनिस खेळायला सुरुवात केली आहे. टेनिसचा आनंद घेतानाचे त्यांचे फोटो समोर आले होते.

राज ठाकरेंसाठी शिवाजी पार्क हे ‘कृष्णकुंज’चे अंगण असल्यासारखेच आहे. ते दररोज संध्याकाळी शिवाजी पार्क जिमखान्यात जातात आणि लॉन टेनिस खेळाचा मनमुराद आनंद घेतात.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंचा थाट  ;  सरकारने सुरक्षेत कपात करताच मनसेकडून ‘महाराष्ट्र रक्षक’ तैनात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER