राज ठाकरे विनामास्क मंत्रालयात!

Raj Thackeray With out Mask

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात थोड्याच वेळात सर्वपक्षीय बैठक होणार आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंत्रालयात पोहचले आहेत. मंत्रालयात फडणवीस, दरेकर मास्क घालून दिसले; मात्र राज ठाकरे यांनी मास्क न घालताच मंत्रालयात प्रवेश केला आहे. हे पाहून राज ठाकरे साहेब मास्क घाला, काळजी घ्या, असे आवाहन त्यांच्या चाहत्यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंची भावना योग्य असेल पण, दारू म्हणजे कोरोनावरील ‘लस’ नव्हे – शिवसेना

या बैठकीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातदेखील मंत्रालयात पोहचले आहेत. राज ठाकरे यांनी मास्क न घातल्याने अनेक जण त्यांच्याविषयी काळजी व्यक्त करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास एक हजार रुपये दंड आहे. दरम्यान, कोरोनाला मात देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली असून, ते सर्वांचे मत जाणून घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह १८ पक्षांच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.


Web Title : Raj Thackeray in the ministry without a mask

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)