
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी (Gram Panchayat Election)राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सुद्धा ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी राज आज पुण्यात आले असून पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा सुरू केली आहे. राज यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत एन्ट्री केल्यामुळे कोणाची डोकेदुखी वाढणार ? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे आज सकाळीच पुण्यता आले. मनसेने ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून या पार्श्वभूमीवर राज यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पुण्यात आल्यावर त्यांनी मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर यांच्याशी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा सुरू केली आहे. कोणत्या मतदारसंघात मनसेचा किती प्रभाव आहे? त्याभागातील मनसेचं संघटन कसं आहे? कोणते कार्यकर्ते काम करतात? पुण्यातील किती ग्रामपंचायतीसाठी उमदेवार उभे केले जाऊ शकतात? त्यांची परिस्थिती काय आहे? इतर पक्षातील कोणी पदाधिकारी मनसेत येणार आहेत का? आदी सर्व गोष्टींचा आढावा या पदाधिकाऱ्यांकडून राज घेत असल्याचं सूत्रांनी सांगितले .
यावेळी राज यांनी 23 तारखेनंतर पुणे जिल्ह्यात मेळावा घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यासाठी मैदान बुक करून कामाला लागण्याचे आदेशही राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले .
ही बातमी पण वाचा : शिवसेनेचा भाजपला धक्का, सांगलीतील भाजप नेत्यांनी बांधले शिवबंधन
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला