राज ठाकरेंची शिकवण, मनसैनिकाने माणुसकी दाखवत वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण

MNS Raj Thackeray

मुंबई : आज सकाळी मुंबई पुणे महामार्गावर एका प्रायव्हेट गाडीला भीषण अपघात (Accident) झाला. यावेळी रस्त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी (MNS) सेनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र अग्रवाल (Jitendra Agarwal) यांना अपघात झाल्याचे दिसून आले. मात्र अपघातग्रस्तांचा मदतीला कोणीही धावून आले नसल्याचे पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली गाडी थांबवून नजीकच्या पोलीस यंत्रणेला आणि अंबुलन्सला घटनास्थळी बोलावून घेतले. आणि स्वतः पुढाकार घेऊन अपघात ग्रस्तांना त्वरित नजीकच्या इस्पितळात पोचवण्याची व्यवस्था केली.

त्यांच्या ह्या जबाबदारीच्या कार्याचे स्थानिक पोलीस प्रश्नासनाने कौतुक केले आणि आभार मानले.पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महाराष्ट्र सैनिकांना दिलेली शिकवण आणि त्यातून घडलेला एक जबाबदार नागरिक याच उत्तम उदाहरण यानिमित्ताने बघावयास मिळाले. आपण सर्वांनी देखील एक जबाबदार नागरिक या नात्याने आपलं कर्तव्य पार पाडल पाहिजे हा संदेश जितेंद्र अग्रवाल यांनी नागरिकांना यानिमित्ताने दिला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button