राज ठाकरेंकडून ‘वीर सावरकर’ यांना अभिवादन, फोटो शेअर करत म्हणाले

Raj Thackeray - Veer Sawarkar - Maharashtra Today

मुंबई : अंदमानच्या काळकोठडीत ११ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगणारे, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान, प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, लेखक, कवी, नाटककार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. सावरकरांच्या जयंतीनिमित्त अनेकांकडून त्यांना अभिवादन केले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही वीर सावरकरांना अभिवादन केले आहे.

‘धर्मग्रंथांवर समाज उभा करण्याचे दिवस आता गेले, समाज उभा करायचा असेल, टिकवायचा असेल तर तो विज्ञाननिष्ठ विचारांनीच’ हा सावरकरांचा विचार होता. कोरोनाने सगळ्याच रूढ कल्पना, धारणा उन्मळून टाकलेल्या असताना, त्या धारणांना रूढींना तपासून बघण्याची प्रेरणा देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विनम्र अभिवादन, असे म्हणत राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button