या वातावरणात वाढदिवस साजरा करणे पटत नाही, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याना दिला संदेश …

मुंबई : सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचे (Corona Crises) संकट आहे. राज्यात कालच एका दिवसात १२,२०७ नवे रुग्ण आढळलेत. दीड लाखांपेक्षा जास्त उपचार घेत आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणे मनाला पटत नाही. त्यामुळे वाढदिवशी भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा, असे आवाहन मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना केले.

राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केले – दरवर्षी माझ्या वाढदिवसा (१४ जून)ला आपण भेटतो. तुम्ही फार प्रेमाने अनेक ठिकाणाहून येता. तुम्हाला भेटल्यावर मलाही आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, उर्जा मिळते. तशी उर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माझ्या दृष्टीने वाढदिवस दिवस तुमच्या सहवासात, तुम्हाला भेटल्याने खरा साजरा होतो.

तुमच्या भेटीची मी वाट पाहात असतो. मात्र हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखंच. अजूनही कोरोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाऊन उठतो आहे. हळूहळू सगळे पूर्वपदावर यायला लागले आहे. परंतु परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. अशा वातावरणात वाढदिवस वगैरे साजरा करणे मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button