डोंबिवलीतील खिंडार राज ठाकरेंनी २४ तासांत बुजवले

Raj Thackeray filled the gap in Dombivali in 24 hours

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम (Rajesh Kadam) यांनी पक्ष सोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पडलेले खिंडार २४ तासांत  बुजवले. मनसेच्या शहर अध्यक्षपदी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी खंदे शिलेदार निवडून सेनेला दाखवून दिले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येयधोरणे आणि कार्यक्रम आपण वेळोवेळी आपल्या विभागात निष्ठेने राबवावी आणि यामध्ये आपणाकडून कोणतीही कुचराई किंवा तडजोड स्वीकारली जाणार नाही, याची आपण नोंद घ्यावी. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, अशा प्रकारचे आपले वर्तन असेल, अशी अपेक्षा यावेळी मनोज घरत यांना सुपूर्द केलेल्या नियुक्तिपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच, आपली नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. आपला शहर अध्यक्षपदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असंही या पत्रात म्हटलं आहे. राजेश कदम यांच्या जागी आता मनोज घरत यांची डोंबिवली शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत मनसेला सत्तेत येण्यासाठी पक्ष तयारी करत असल्याची प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. तसेच, कोणी गेलं असेल तरी पक्षाला कोणताही धक्का बसलेला नाही. जे कोणी गेले आहेत, त्यांची काही मजबुरी असेल. जे गेले आहेत ते म्हणत आहेत की आमची मनसे पक्षावर नाराजी नाही, म्हणजे त्यांचा काहीतरी नाइलाज असेल, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER