‘भारतमाता’ पुन्हा मोदींना ओवाळणार नाही; राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रातून टीका

Cartoon

मुंबई : सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करत सत्ता मिळवली . पण २०१९ मध्ये तसं होणार नाही, ‘भारतमाता’ पुन्हा मोदींना ओवाळणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून मोदी सरकारवर टीका केली आहे .

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिवाळीचे औचित्य साधून व्यंगचित्राची मालिका घेऊन येणार असल्याचे जाहीर केले होते. आज भाऊबीजनिमित्त काढलेल्या व्यंगचित्रातून मोदी आणि भारतमातेला दाखवण्यात आले आहे. भारतमातेकडून ओवाळून घेण्यासाठी मोदी पाटावर बसल्याचे दाखवले आहे. मात्र, भारतमातेसमोर २०१४ मधील आश्वासनं आणि २०१८ मधील परिस्थिती दाखवण्यात आली आहे.

२०१४ मध्ये मोदींनी अनेक खोटी आश्वासने दिली आहे . २०१४ मध्ये मोदींनी ५ वर्षात देशात १०० स्मार्टसिटी,  २०१८ मध्ये राफेल भ्रष्टाचार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्टाच्या स्वायत्ततेवर घाला घालण्यात आल्याची टीका , महिलांवरील अत्याचारात वाढ, रुपयाची ऐतिहासिक घसरण , निवडणूक आयोगाचीही गळचेपी, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, गंगा साफ करणार, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पाकिस्तानला धडा शिकवणार, भ्रष्टाचारी काळेपैसेवाले पकडणार, अशी आश्वासनं दिली.

 ही बातमी पण वाचा : लक्ष्मी पूजनाचे औचित्य साधून राज ठाकरे यांची मोदी, गडकरींवर व्यंगचित्रातून टीका

पण २०१८ उजाडला तरीही या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, असे या व्यंगचित्रातून दाखविण्यात आले आहे . या सगळ्या खोट्या आश्वासनांमुळे गेल्या वेळेस ओवाळले, पण आता यापुढे ओवाळणार नाही’, असे विचार भारतमातेच्या मनात आल्याचे व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून भाजपा सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे .