राम मंदिरासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल मोदी सरकारचे मनापासून आभार – राज ठाकरे

Raj Thackeray-PM Modi-Ram temple

मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त भूमी ही राम जन्मभूमीच असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राम मंदिराच्या बांधणीचा मार्ग मोकळा झाला होता. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या दृष्टीन केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला असून, मंदिराच्या बांधणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार ट्र्स्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केली.

मोदींनी लोकसभेत याबाबत घोषणा करताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करत मोदी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली. ह्या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा. ह्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून आभार. असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यता उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीनंतर राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला जवळ केले आहे. २३ जानेवारी रोजी मनसेच्या महाअधिवेशनात त्यांनी पक्षाच्या झेंड्यात बदल करत भगव्या रंगलास्थान दिल. विशेष म्हणजे या झेंड्यात शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेलाही स्थान दिल्या गेल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.