राज ठाकरेंनी केले ममता बॅनर्जींचे अभिनंदन; म्हणालेत…

Raj Thackeray - Mamata Banerjee - Maharashtra Today
Raj Thackeray - Mamata Banerjee - Maharashtra Today

मुंबई : संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायिभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवले. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा, या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ह्यांच्यात खूप समानता आहे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या शब्दांत विधानसभेतील निवडणुकीच्या विजयाबद्दल ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे अभिनंदन केले.

राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता यांचे महत्त्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्ततेसाठी आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसमावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल, अशी आशा व्यक्त करतो. तुम्हाला मिळालेल्या यशासाठी तुमचे  आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button