‘एमएसईबी’चे कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन, म्हणाले…

Sushant Kute-Raj Thackeray

पुणे : लॉकडाऊन (Lockdown) काळात महावितरणकडून पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाविरोधात मनसैनिकांनी शिरूर येथील महावितरणचे कार्यालय फोडले होते. त्यानंतर जवळपास १२ दिवसांनंतर या मनसैनिकांची सुटका झाली. त्यानंतर ‘एमएसईबी’चे कार्यालय (MSEB office) फोडणाऱ्या मनसैनिकाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फोन केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचे कौतुक करताना “आत्मचरित्राची पानं वाढली” असे उद्गार राज ठाकरेंनी काढले. पुण्यातील शिरूरमध्ये असलेले ‘एमएसईबी’चे कार्यालय फोडल्याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. १२ दिवसांनंतर त्यांची सुटका झाल्यावर राज ठाकरे यांनी मनसैनिक सुशांत कुटे यांना फोन केला.

राज ठाकरे आणि सुशांत कुटे यांच्यात झालेला संवाद :
राज ठाकरे : जय महाराष्ट्र !
सुशांत कुटे : जय महाराष्ट्र, ते आंदोलन झालं, रविवारी सुटलो आम्ही.
राज ठाकरे : बरं, चला अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं.
सुशांत कुटे : नांदगावकर साहेबांनी खूप मदत केली, घरच्यांना फोन वगैरे केला, सगळ्यांशी बोलले.
राज ठाकरे : हो न?
सुशांत कुटे : हो, आणि तुमचंही लक्ष होतं. त्यांनी सांगितलं… गणपतीमुळे काय भेट नाही झाली.
राज ठाकरे : काय त्रास नाही न झाला?
सुशांत कुटे : नाही साहेब, त्रास नाही झाला. १२ दिवस लागले तिथे फक्त.
राज ठाकरे : हा ते ठीक आहे, आत्मचरित्राची पानं वाढली.
सुशांत कुटे : हाहाहा, तुमचा आशीर्वाद आहे साहेब, बाकी काय!
राज ठाकरे : शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना.
सुशांत कुटे : गणपती झाल्यावर भेटायला येतो.
राज ठाकरे : हो या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER