मदतीची अपेक्षा करणाऱ्या ९० वर्षीय शिक्षिकेला राज ठाकरेंचा फोन, भेटीचे प्रॉमिसही दिले

raj-thackeray

मुंबई :- तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) नुकसान झाल्यामुळे मदतीची याचना करणाऱ्या ९०वर्षीय शिक्षिका सुमन रणदिवे यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ संपर्क साधला. रणदिवे ताईंशी फोनवरुन संपर्क साधून शिक्षिकेची विचारपूस करत राज ठाकरेंनी भेटायला येण्याचं आश्वासनही दिलं.

सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), जयंत पाटील (Jaynt Patil) यांच्यासह मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अनेक बड्या राजकीय नेत्यांना शिक्षणाचे धडे दिले आहेत. आधी पतीचं छत्र हरवलं, नंतर मुलालाही काळाने हिरावलं. सध्या त्या वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ फाऊंडेशन” या वृद्धाश्रमात वास्तव्य करत आहेत. या वृद्धाश्रमाला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. त्यामुळे सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील यांच्याकडे मदतीचे आवाहन केले होते. याबाबतचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय तसेच राज ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली. राज ठाकरे यांनी थेट फोन करुन रणदिवे ताईंशी संवाद साधला.

राज ठाकरे यांच्याशी रणदिवे ताईंशी झालेला संवाद…

सुमन रणदिवे : राजा
राज ठाकरे : हा नमस्कार कशा आहात?
सुमन रणदिवे : मी सुमनताई रणदिवे, वसईहून बोलतेय, तुमच्या घरी यायचे माहितेय ना ट्यूशनला वगैरे…
राज ठाकरे : हो हो, काय त्रास झाला, काय प्रॉब्लेम आहे?
सुमन रणदिवे : मध्यंतरी तू क्रिकेट मैदानाला आला होतास, पण त्या लोकांनी मला तुझी भेट दिली नाही. आमचं खूप नुकसान झालंय, जरा जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढं बघ ना
राज ठाकरे : मी आमच्या अविनाश जाधव यांना सांगितलं आहे, ते सर्व प्रकारची मदत करतील. त्यामुळे काही काळजी करु नका, तब्येत वगैरे सगळं ठीक आहे ना?
सुमन रणदिवे : हो ठीक आहे, कुंदाताई काय म्हणत आहेत?
राज ठाकरे : आई बरी आहे
सुमन रणदिवे : ए तू ये ना एकदा मला भेटायला
राज ठाकरे : येतो, मी येतो, लॉकडाऊन वगैरे संपलं की भेटू
सुमन रणदिवे : नक्की, प्रॉमिस?
राज ठाकरे : हो नक्की

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button