सगळं सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणार; राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना पत्र

mns party workers-Raj Thackeray

मुंबई :- राज ठाकरे यांचा दोन येत्या 14 जूनला वाढदिवस आहे. त्यांनी यंदाचा वाढदिवस कुटुंबासोबत घरीच राहून अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच पार्श्वभूमीवर राज यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहीले आहे.

“मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत” असे आवाहन राज यांनी पत्रातून मनसे कार्यकर्त्यांना केले आहे.

कोरोनाच्या संकटात मनसे कार्यकर्ते जीवावर उदार होऊन मैदानात उतरून काम करत आहेत. त्याचा मला अभिमान आहे. मी भाग्यावान आहे मला तुमच्यासारखे सहकारी मिळालेत. अशा भावना राज यांनी पत्रातून व्यक्त केल्या आहेत.

तसेच, पत्रात राज ठाकरेंनी कार्कर्त्यांना जिथे आहात तिथेच थांबा, माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छा देण्यास न येता आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे आवाहन राज यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

ही बातमी पण वाचा : “जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे”, हेच राज ठाकरेंचे मत

राज ठाकरे पत्रात म्हणाले, 14 तारखेला माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही, थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणे अजिबात उचित नाही. म्हणूनच पक्षातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना माझ्या सूचनावजा आदेश आहेत की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. पण हे करताना तुम्ही तुमच्या आणि कुटुंबाच्या जीवाची काळजी घ्या, तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाचं काहीच नाही. सगळं सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणार आहेच, तेव्हा तुमच्याशी भेट होईलच.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER