चित्र-नाट्य-मालिकासृष्टीतील लहान-मोठ्या घटकांचे प्रश्नही सुटेल; राज ठाकरेंचे आश्वासन

Raj-Uddhav Thackeray

मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यात बंद पडलेल्या चित्रपट-मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आलेलं असून, मालिका निर्माते आणि वाहिन्यांचे प्रमुख यांनी कडक निर्बंध पाळून, बायो बबलमध्ये चित्रीकरण कसं करणार यासंदर्भातला प्रस्ताव दिल्यास त्यांना मंजुरी देता येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

त्यानंतर राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी चित्र-नाट्य-मालिकासृष्टीतील (picture-drama-series) लहान-मोठ्या घटकांचे प्रश्नही सुटेल, असेही आश्वासन दिले आहे. चहूबाजूंनी नैराश्याचे ढग दाटलेले असताना मनोरंजनही तितकंच आवश्यक आहे आणि ह्या चित्र-नाट्य-मालिकासृष्टीवर अवलंबून असणाऱ्या असंख्य लहान-मोठ्या घटकांच्या चरितार्थाचा प्रश्नही सुटेल, असे आश्वासन मनसेकडून देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button