मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंचे डब्बेवाल्याना अश्वासन

मुंबई : मागील सहा महिन्यांपासून लोकलची सेवा बंद असल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांनी (Mumbai-dabbawala) आज (24 सप्टेंबर) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी डबेवाल्याना लोकलमधून प्रवासाची परवानगी मिळवून देण्याची मागणी केली. तसेच डबेवाल्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी राज ठाकरे यांच्याकडे केली.

ही बातमी पण वाचा:- राज ठाकरेंसमोर डबेवाल्यांनी मांडल्या व्यथा ; निवेदनात केल्या विविध मागण्या 

या भेटीदरम्यान, राज ठाकरे यांनी डब्बेवाल्यांच्या समस्या जाणून घेत याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. चर्चेतून मार्ग निघावा अशी माझी भूमिका आहे. मात्र सरकार सामान्य जनतेसाठी लोकल सुरू करण्यास गंभीर नाही. अनेकांना रोजगारासाठी मुंबईत यावे लागत आहे. मात्र लोकल सेवा बंद असल्याने त्यांना मोठा त्रास होत असल्याची जाणीव मला आहे. सर्वसामान्य जनतेला लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले. आता जर चर्चेतून मार्ग निघाला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करु, असे आश्वासन राज ठाकरे यांनी डब्बेवाल्याना दिल्याची माहिती मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

दरम्यान, राज ठाकरेंच्या भेटीआधी डब्बेवाल्यानी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. आम्हाला लोकलमधून परवानगी देण्यात येत नाही तर किमान अत्यावश्यक सेवांमध्ये आमची सेवा सामावून घेत प्रवास करू देण्यात यावा अशीही विनंती आम्ही केली होती. परंतु तीदेखील मान्य करण्यात आली नाही. आमची मागणी मनसेनं उचलून धरली आणि त्यांनी आंदोलन केलं. यासाठी आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी आलो आहोत. मनसेनं आदोलन करून वात पेटवली आहे. त्याचा भडका केव्हाही होऊ शकतो. थोड्याफार प्रमाणात तरी सरकारनं सेवा सुरू करावी, अशी मागणी डब्बेवाल्यानी यावेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER