…यासाठी तमाम मराठ्यांनी ‘पानिपत’ बघावा; राज ठाकरेंच आवाहन

raj-thackeray-appeal-to-see-panipat-movie

मुंबई :- उद्या शुक्रवारी आशुतोष गोवारीकर यांचा बहुप्रतिक्षित पानिपत हा चित्रपट महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पानिपत या चित्रपटाचं कौतुक करत मराठी माणसांना एक आवाहन केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.

Pzपानिपतची लढाई ही मऱ्हाटेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपावणाऱ्या मरहट्ट्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटेकापार झेंडा नेणारी मऱ्हाटेशाही कुठे आणि का कमी पडली? त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझए मित्र आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ चित्रपट. प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनीदेखील पहायला हवा, अशा आशयाचं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.

‘शंकरा रे शंकरा’ तान्हाजी सिनेमातील नवं गाणं रिलीज