ठाणे बंद मागे घेण्याचे राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Raj Thackeray

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे बंदचे आवाहन मागे घेतले आहे. लोकांना त्रास होईल असे काही करू नका, असे सांगितल्यामुळे त्यांच्या आदेशानुसार आम्ही बंद पाठीमागे घेत आहोत, असे मनसे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. त्यांना चौकशीची नोटीस पाठविल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता आणि त्या तीव्र भावनेने आम्ही सरकार विरोधी ठाणे बंदचा इशारा दिला होता, असे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा:- ‘ठाणे’ बंद चा मनसेचा इशारा

कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी राज ठाकरेंना ईडीने नोटीस बजावल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. २२ ऑगस्टला राज ठाकरेंना ईडीपुढे हजर राहायचे आहे. राज ठाकरेंवर प्रेम करणारे कार्यकर्ते त्या दिवशी उत्स्फूर्तपणे बाहेर पडतील, त्यामुळे काय घडेल सांगता येत नाही, असे सूचक विधान मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी केले आहे. अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, असेही त्यांनी म्हटले आहे. परंतु जनतेला वेठीस न धरण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी मनसेला दिला आहे. त्यानंतर राज ठाकरेंनीही जनतेला त्रास होईल, असे न वागण्याचा मनसे कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.