राज ठाकरे आणि फडणवीस दोघेही अयोध्येला जाणार, युती करणार?

Patil-Fadnavis-Thackeray

सोलापूर :- मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वाची बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत पक्षाध्यक्ष राज ठाकरे मार्च महिन्यात अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही तासातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही अयोध्येला जाण्याचे जाहीर केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठे विधान केले.

राज ठाकरे (Raj Thackeray) परप्रांतीयांबाबतची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत भाजप त्यांच्याशी युती करणार नाही, असे महत्त्वाचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने आता राजकारणात नवा ट्विटस्ट आणला आहे. त्यांनी अट घालून एकप्रकारे मनसेशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे भाजपशी युती करण्यासाठी ही अट मान्य करणार का, हे आता पाहावे लागेल.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपासंदर्भातही भाष्य केले. धनंजय मुंडे यांचे वर्तन नैतिकतेत आणि कायद्यात बसते का, याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी द्यावे. आम्ही या प्रश्नावरुन विधानसभेत राज्य सरकारला धारेवर धरणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे राज्य सरकारने करुणा शर्मा प्रकरणात बाजू मांडावी. देवेंद्र फडणवीसही याच मताचे असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कर्नाटकमधील भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत. कर्नाटकमधील भाजप नेत्यांचे आम्ही समर्थन करत नाहीत. कर्नाटकातील 842 गावांमध्ये असलेले मराठी भाषिक हे आपल्या भूभागासह महाराष्ट्रामध्ये आलेच पाहिजे, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER