मराठीसाठी राज ठाकरे आक्रमक; ॲमेझॉन-फ्लिपकार्टला सात दिवसांची मुदत

Raj Thackeray

मुंबई : अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने या दोन कंपन्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत जर त्यांनी त्यांच्या ॲपमध्ये मराठी भाषेचा पर्याय दिला नाही तर त्यांचा मनसे (MNS) स्टाईल समाचार घेण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

ज्याप्रमाणे या कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य देऊन तिथे त्यांच्या भाषेत ॲप सुरू केले, तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत ॲप आणावे; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा दिवाळीचा सण मनसे स्टाईल साजरा करेल, असा इशारा दिला आहे. ॲमेझॉन व फ्लिपकार्ट यांनी याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

दाक्षिणात्य भागांमध्ये तेथील भाषांनुसार ॲप सुरू केलं जात असेल तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काही कोळी महिलांनी कृष्णकुंजवर येऊन राज ठाकरेंकडे (Raj Thackeray) आपल्या समस्या व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर मासेविक्री करणाऱ्यांचा मनसे स्टाईल  समाचार घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER