वीज बिलाविरोधात राज ठाकरे आक्रमक; ऊर्जामंत्र्यांविरोधात तक्रारी दाखल करण्याचे आदेश

Raj Thackeray - Nitin Raut

मुंबई : वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज राज ठाकरे (Raj Thackeray) आक्रमक झाले असून त्यांनी नवी भूमिका जाहीर केली आहे. उद्योगपती अडाणी आणि ऊर्जामंत्र्याविरोधात राज्यातील सर्व पोलीस स्थानकांमध्ये तक्रारी देण्याचे आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते-कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी वाढीव वीज बिलासंदर्भात यू-टर्न घेतल्याने त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने केली आहे.

यासाठी राज्यातील सर्व पोलीस स्थानकांमध्ये तक्रारी देण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते-कार्यकर्ते यांना दिले आहेत. कोरोना (Corona) संसर्गाच्या काळात असलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) सर्वसामान्य लोकांना वाढीव बीज बिल  पाठवण्यात आलं होत. हेच वाढीव वीज बिल कमी करून लोकांना दिलासा देऊ, असं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं होतं. मात्र काहीच दिवसांत त्यांनी त्यांच्या आश्वासनावरून यू-टर्न घेतला.

आपल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, हे लक्षात आल्यानंतर ऊर्जामंत्र्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला. वीज ग्राहकांनी वीज बिल भरलं नाही तर महावितरणनं (MSEDCL) वीज खंडित करण्याचा इशारा दिला आहे. सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचं सांगत सरकारने भानावर येऊन ज्या जनतेने आपल्याला सेवेची संधी दिली त्या जनतेच्या भल्याचे निर्णय घ्यावेत, असं मनसेने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER