हाताच्या शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे लीलावती रुग्णालयात?

Raj Thackeray

मुंबई :- राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या (Corona Patients) पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत; पण रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नसल्यानं राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोना स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेत आहेत. या बैठकीला सर्वच पक्षांचे नेते सहभागी झाले असून, केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सहभागी झालेले नाहीत. एवढ्या महत्त्वाच्या बैठकीतही राज ठाकरे का हजर झाले नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आता त्यांच्याबाबत वेगळीच माहिती पुढे आली आहे.

राज ठाकरे हे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती टीव्ही-९ मराठीने दिली आहे. राज ठाकरे यांच्या हाताची शस्त्रक्रिया होणार असून, त्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती टीव्ही-९ ने दिली आहे. राज ठाकरे रुग्णालयात असल्याने ते या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत, अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button