राज ठाकरे पुण्यात सक्रिय ; ‘या’ आक्रमक नेत्याकडे मोठी जबाबदारी

Raj Thackeray - Vasant More

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कंबर कसली आहे .

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) खांदेपालट करण्यात आला आहे. यामध्ये मनसेचे डॅशिंग आणि आक्रमक नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान शहर अध्यक्ष अजय शिंदे (Ajay Shinde) यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर बैठकांचे सत्र सुरू आहे.

या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यांतील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी राज ठाकरे यांच्याकडून पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आलेले वसंत मोरे हे आक्रमक नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्यांनी कोरोनाच्या (Corona) काळात अनेक कामे केली होती. याच कामगिरीमुळे वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपवण्यात आल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER