शिवसेनेला धक्का ; राज ठाकरेंची भाजपाला साथ , 4 मार्चला नाशिकच्या दौऱ्यावर

Raj Thackeray

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा सक्रिय झाले आहे. येत्या 4 तारखेला नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते मनसेच्या (MNS) निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते.

याशिवाय, राज ठाकरे नाशिकमध्ये एका विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या आप्तेष्टांचा हा विवाहसोहळा आहे. काही दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांनी कृष्णकुंज निवासस्थानी येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मनसे साथ देणार असल्याचे कळते. सभापतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपला मदत करणार आहे. सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप खबरदारी घेताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER