राज ठाकरेंनी शिवसेनेचे आव्हान स्वीकारले, आज थेट नाणार प्रकल्पग्रस्तांशी भेट

Raj Thackeray-Uddhav Thackeray

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प ठाकरे सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनोनंतर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला चालना द्यायची असेल तर’ रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखं नाही, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)यांना रविवारी पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्यानंतर राज ठाकरेंवर शिवसेनेकडून आरोप करण्यात आले आहेत. नाणारमध्ये २२१ भूमाफियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्यासाठी राज ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे का?, असा सवाल करत हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी नाणार वासियांसमोर भूमिका मांडावी, असे आव्हान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंना दिलं होतं. त्यामुळे शिवसेनेचे हे आव्हान राज ठाकरेंनी स्वीकारलेले असून, त्यांनी नाणार प्रकल्पग्रस्तांना चर्चेसाठी आज कृष्णकुंज या निवासस्थानी बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. यावेळी राज ठाकरे जमीन मालकांचे म्हणणं ऐकणार आहे.

नाणारमधील जमीन मालकांना राज ठाकरेंनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. आज सकाळी 11 वाजता ही भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी पण वाचा : आधी मुख्यमंत्री, पवारांना पत्र, तर उद्या राज ठाकरेंची नाणार प्रकल्पग्रस्तांशी चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER