पाकिस्तानातील राज कपूरच्या घराचे झाले म्युझियम

Raj Kapoor

बॉलिवूडचे (Bollywood) दोन महान कलाकार राज कपूर (Raj Kapoor) आणि दिलीपकुमार (Dilip Kapoor) मूळचे पाकिस्तानच्या (Pakistan) पेशावरचे आहेत. फाळणीपूर्वी भारत-पाकिस्तान एकच होते. तेव्हा लाहोरपासून मुंबईपर्यंत सगळे एक होते. मात्र फाळणीनंतर अनेक हिंदू आणि मुस्लिम भारतात आले. युसूफ खान ऊर्फ दिलीपकुमार आणि राज कपूर हे त्यापैकीच एक. या दोघांचीही पाकिस्तानात घरे अजूनही आहेत. मात्र या घरांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. राज कपूरच्या हवेलीच्या मालकाने हवेली विकायला काढली होती.

परंतु ती राज कपूरची हवेली असल्याचे समजल्यानंतर पाकिस्तान सरकारने हवेलीची डागडुजी करून तेथे राज कपूरचे म्युझियम बनवले आहे. दिलीप आणि राज कपूरसह शाहरुख खानचे मूळही पेशावरच आहे. तेथे त्याचे घर असून ते चांगल्या स्थितीत तर आहेच; त्या घरात शाहरुख खानचे नातेवाईक राहात आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात राज कपूरच्या कुटुंबाची एक मोठी हवेली होती. या हवेलीत ४० खोल्या आहेत. या हवेलीचे डिझाईन मोगलकालीन आणि ब्रिटिशकाळाचे आहे. यात मोठमोठे दरवाजे आणि गॉथिक स्टायलच्या खिडक्या आहेत.

अत्यंत जर्जर अवस्थेत असलेल्या या हवेलीला आता पुन्हा पूर्वीचेच रूप देण्यात आले आहे. दिलीपकुमारचेही पेशावरमध्ये घर असले तरी ते राज कपूरच्या घराप्रमाणे भव्य नसून एका छोट्या गल्लीमध्ये आहे. या घराचीही अवस्था अत्यंत वाईट झाली असून दरवाजे तर पडले आहेतच. छतही नाही. राज कपूरच्या घराप्रमाणे दिलीपकुमारचे घरही ऐतिहासिक वारसा असल्याने त्याचेही संरक्षण सरकार करणार आहे. याचे कामही लवकरच सुरू केले जाणार असल्याचे सांगितले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER